महाराष्ट्रात १४ वर्षानंतर सिंहाचा जन्म; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाळणा हलला

    17-Jan-2025   
Total Views | 777
lion cub born in national park



मुंबई (अक्षय मांडवकर) -
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये पाळणा हलला आहे (lion cub born in national park). सफारीमधील 'मानसी' नामक मादी सिंहाने गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी रात्री गोंडस छाव्याला जन्म दिला (lion cub born in national park). 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील प्राणिसंग्रहालयात जवळपास १४ वर्षांनी सिंहाचा जन्म झाला आहे. (lion cub born in national park)
 
 
राष्ट्रीय उद्यानातील सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. यातील सिंह सफारीमध्ये गुरुवारी रात्री छव्याचा जन्म झाला. डिसेंबर, २०२२ साली गुजरातमधून 'मानस' आणि 'मानसी' या सिंहाच्या जोडीला राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. उद्यानात दाखल झाल्यावर या जोडीमध्ये तणाव होता. कारण, नर 'मानस' हा रागीष्ट असल्याने तो मादीला स्वीकारत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये मिलन होत नव्हते. काही वेळा त्याने मादीला जखमी केल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. दरम्यानच्या काळात मादी 'मानसी' ही आजारी पडली. १८ दिवस तिने काही खाल्ले नाही. मात्र, उद्यानाच्या पशुवैद्यकाच्या टीमने 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने 'मानसी'वर उपचार करुन तिला जीवदान दिले. त्यानंतर उद्यानाचे संचालक जी.मल्लिकार्जुन, विभागीय वन अधिकारी रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनअंतर्गत पशुवैद्यक डाॅ. विनया जंगले आणि त्यांच्या टीमने 'मानस' आणि 'मानसी' यांच्या मिलनसाठी प्रयत्न सुरू केले. सप्टेंबर, २०२४ साली त्याला यश मिळाले. ३० सप्टेंबर रोजी या जोडीचे शेवटचे मिलन पार पडले. त्यानंतर प्रतीक्षा सुरू झाली.
 
 
आॅक्टोबर महिन्यापासून 'मानसी' गरोदर असल्याची लक्षणे पशुवैद्यकीय चमूला आढळून आली. नोव्हेंबर, २०२४ साली तपासणी केल्यानंतर ती गरोदर असण्यावर शिक्कामोर्तब झाले. मिलनानंतर जवळपास १०८ दिवसांनी गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता 'मानसी'ने गोंडस छाव्याला जन्म दिला. महत्त्वाचे म्हणजे १६ जानेवारी रोजीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या दोघांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पिल्लू हे सुखरूप असून त्याचे वजन हे १ किलो ३०० ग्रॅम एवढे आहे.
 
 
पूर्वइतिहास...
राष्ट्रीय उद्यानात २००९ साली बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यानातून 'रविंद्र' आणि 'शोभा' नामक सिंहाची एक जोडी आणण्यात आली होती. 'रविंद्र' आणि 'शोभा' या जोडीने राष्ट्रीय उद्यानात २०११ साली तीन छाव्यांना जन्म दिला. यातील एक छावा नर, तर दोन मादी होत्या. त्यांचे नाव 'गोपा', 'जेस्पा' आणि 'लिटील शोभा' असे ठेवण्यात आले. 'रविंद्र' आणि 'शोभा'सोबत सिंह सफारीत नांदणारे हे तिन्ही छावे पाहण्यासाठी त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असे. 'शोभा' देखील या छाव्यांना घेऊन सफारीच्या बससमोरुन ऐटीत चालत असे. कालांतराने 'शोभा' आणि 'लिटील शोभा'च्या मृत्यूनंतर हे कुटुंब त्रिकोणी झाले. 'रविंद्र'ला देखील आजाराने घेरले. 'गोपा' आणि 'जेस्पा' यांच्या बळावर सिंह सफारी सुरू होती. मात्र, त्यानंतर 'गोपा'ही आजारी पडली. २०२१ साली तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आॅक्टोबर,२०२२ महिन्यात १७ वर्षीय 'रविंद्र' देखील मृत पावला आणि त्याच महिन्यात 'जेस्पा' देखील मृत्यू झाल्याने राष्ट्रीय उद्यानातील सिंहाच्या या कुटुंबाचा करुण अंत झाला होता. मात्र, आता 'मानस' आणि 'मानसी'च्या या नव्या छाव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीला उमेदीचे दिवस येणार आहेत.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
संतमय वातावरणात पंढरपूरची

संतमय वातावरणात पंढरपूरची 'वारी' या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न!

पंढरीची 'वारी' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे...

अखेर योग जुळून आला... मुक्ताईं च्या कृपेने थेट दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींशी घेतली भेट!

अखेर योग जुळून आला... मुक्ताईं च्या कृपेने थेट दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींशी घेतली भेट!

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शनातून दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121