ICE 3 : आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन
16-Jan-2025
Total Views | 107
मुंबई: (ICE 3) एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई च्या विशेष शिक्षण विभागाने दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद ICE 3 चे आयोजन केले. या परिषदेला भारतासह अमेरिका, इंग्लंड, इटली, मोरोक्को, जर्मनी, स्वीडन, डब्लिन, भूतान आणि दुबई अशा विविध देशांमधून प्रतिनिधींचा सहभाग मिळाला. परिषदेत एकूण ४००हून अधिक उपस्थिती नोंदवली गेली.
परिषदेमध्ये आठ प्री-कॉन्फरन्स कार्यशाळा, ३८ सत्रे, पॅनल चर्चा, फायरसाइड चॅट्स, ५८ शोधनिबंध सादरीकरणे आणि ११ पोस्टर सादरीकरणे आयोजित करण्यात आली. देशभरातून आलेल्या ३५ भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी आणि २० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला.
प्री-कॉन्फरन्स कार्यशाळांचे उद्घाटन कुलगुरु, प्रा. उज्वला चक्रदेव, नितीन पाटील (IAS), सचिव, मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य परिषदेचे उद्घाटन टी. डी. धरियाल (IAS), माजी अपंग आयुक्त, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
परिषदेसमाप्ती समारंभात डॉ. रुपेश राऊत, संयुक्त संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. तसेच, डॉ. अजयकुमार गुप्ता, माजी संचालक, ICSSR, हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही परिषद शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरली असून, शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांच्या आदानप्रदानासाठी एक महत्वाचा व्यासपीठ ठरली.