मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी मुंबई-पुणे प्रवासाची गती वाढविणाऱ्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. अशावेळी प्रकल्पाचे काम आव्हानात्मक टप्प्यावर आहे. या मार्गातील सर्वात आव्हानात्मक केबल स्टेड पुलाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. ६,६९५ कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरु आहे. हा प्रकल्प जून २०२५पर्यंत मिसिंग लिंक पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने ठेवले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मार्गातील सर्वात आव्हानात्मक अशा लोणावळा येथे दरीतील खांबांचे बांधकाम आता पूर्ण होणार आहे, पूर्ण झाल्यानंतर, डेकचे काम सुरू केले जाईल. या केबल-स्टेड पूल वगळता, या प्रकल्पातील इतर सर्व विभाग, ज्यात आणखी एक व्हायडेक्ट आणि २ बोगदे आधीच पूर्ण झाले आहेत. तथापि, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मधील घाट विभागाला पूर्णपणे वगळून प्रवास करणे शक्य होईल. कुसगाव आणि खोपोली यांच्यातील एकूण अंतर ६ किलोमीटरने कमी होईल. मिसिंग लिंक रोडचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी काम वेगाने केले जात आहे. दोन बोगदे आणि दोन पूल असलेला या प्रकल्पाचे काम कठीण आहे. तेव्हा घाई करुन कोणतीही जोखीम पत्करता येणार नाही. प्रकल्पासाठी आवश्यक तितका वेळ देऊन काम पूर्ण करण्यात येत आहे.
आव्हानांमुळे विलंब
महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (एमएसआरडीसी) अधिका -यांनी या प्रकल्पाच्या अंतिम मुदतीच्या वाढीमुळे कामातील गुंतागुंत स्पष्ट केले. कारण खोऱ्यात सतत वारे आणि अनिश्चित दृश्यमानता दरम्यान कार्य करणे कठीण होते. यातून खोपोली ते कुसगावपर्यंतचा टप्पा शून्य अपघात क्षेत्र करण्याचा मानस या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय घाटाच्या परिसरात होणारा वाहतुकीचा खोळंबाही यामुळे कमी करता येऊ शकेल. २०१९ साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. २०२२ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र पण कोरोनाच्या साथीमुळे हे काम रखडले. आता जून २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.