मुंबई : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाला’ आजपासून सुरुवात झालेली आहे. २८ जानेवारी २०२५ पर्यंत तो साजरा केला जाणार आहे.
या पंधरवड्यात १५ जानेवारी रोजी डॉ. जयश्री पाटणकर यांचे संदर्भ ग्रंथालय, बदलापूर येथे ‘मराठी व्याकरणातील धातु-विचार’, १६ जानेवारी रोजी डॉ. सतीश बडवे यांचे ‘महानुभावीय गद्याचे भाषिक विशेष मध्ययुगीन साहित्याच्या संदर्भात’ (आभासी व्याख्यान), १८ जानेवारी रोजी श्री. शशिकांत सावंत यांचे संदर्भ ग्रंथालय, बदलापूर येथे ‘मराठी आणि इंग्रजी कोशवाङ्मय’, २४ जानेवारी रोजी डॉ. सोनल कुलकर्णी यांचे ‘असा साकारला मराठीचा पहिला भाषिक नकाशा’ (आभासी व्याख्यान), २७ जानेवारी रोजी डॉ. वीणा ठाकरे यांचे संदर्भ ग्रंथालय, बदलापूर येथे ‘मराठी वाचनवृद्धीसाठी ग्रंथपालांचे योगदान’ आणि २८ जानेवारी रोजी डॉ. महेश देवकर यांचे ‘पाली-मराठी अनुवाद आणि अनुबंध’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे.