महाकुंभमेळातून उत्तरप्रदेशला २५ हजार कोटींचा महसुल अपेक्षित
२ लाख कोटींची एकुण उलाढाल अपेक्षित
13-Jan-2025
Total Views | 52
लखनऊ: हिंदू धर्मातील अतिशय पवित्र अशा महाकुंभमेळ्यास उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सोमवार पासून सुरुवात होत आहे. धार्मिक महत्वासोबतच हा सोहळा अर्थकारणास जोरदार उसळी देणारा ठरणार आहे. या सोहळ्यातुन २ लाख कोटींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उलाढालीतून जवळपास २५ हजार कोटींचा महसुल या सोहळ्यातून अपेक्षित आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यंदाचा कुंभमेळा गर्दीचे उच्चांक मोडणारा ठरणार आहे. ४५ दिवसांच्या या सोहळ्यात तब्बल ३५ कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. या होणाऱ्या मोठ्या सोहळ्यामुळे महिला स्वयंसहायता बचत गट, स्थानिक कारागीर, स्थानिक हॉटेल्स, तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठ्या नाममुद्रा असलेले ब्रँड्स या सर्वच अर्थकारणाला मोठी फायदा होण्याची शक्यता आहे. या सर्वांकडून जवळपास ३ हजार कोटींची गुंतवणुक अपेक्षित आहे.
या संपुर्ण सोहळ्यासाठी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने तब्बल ६ हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करत विविध योजनांची सुरुवात केली आहे. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतेसह आरोग्य योजनांवरही मोठी तरतूद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून राज्याला १ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनन्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यादिशेने सुरु असलेल्या वाटचालीत या कुंभमेळ्यामुळे होणाऱ्या आर्थिक उलाढालींचा खुप फायदा होणार आहे.