मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे लष्करी सार्म्यथ्य कैक पटीने वाढले आहे. आत्मनिर्भर भारतची योजना अंमलात आणत, भारतीय सैन्याला बलशाली करण्याचे काम आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी केले आहे. अशातच आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच १५ जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दर्शकांना भारतीय सैन्य दलातील रोबो डॉग्सची म्हणजेच ARCV-MULE यांची परे़ड बघायला मिळणार आहे.
येत्या सैन्य दिन परेडच्या दिवशी ' रोबो डॉग्स' यांची कवायत दर्शकांना बघायला मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज झालेले रोबो डॉग्स येणाऱ्या काळात भारताच्या लष्करी सैन्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. उंच टेकड्या आणि उतारावर जिथे भारतीय सैन्य पोहोचू शकत नाही, तिथे सैनिकांच्या मदतीला हे रोबो डॉग्स धावून जाणार आहेत. यातील प्रत्येक श्वान १५ किलोपर्यंतचे वजन घेऊन चढू शकतो. प्रतिकूल वातावरणात काम करण्यासाठी सुद्धा हे रोबो डॉग्ज सज्ज आहेत. लष्कराने अलीकडेच ARCV-MULE प्रणालीचे १०० युनिट्स विकत घेतले आहेत. हे रोबोटिक म्यूल्स टेली-ऑपरेबल आणि स्वायत्त वाहने आहेत जी परिमिती सुरक्षा, मालमत्ता संरक्षण, रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल, न्यूक्लियर आणि एक्सप्लोसिव्ह (CBRNE) ऑपरेशन्स, एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल (EOD), आणि इंटेलिजेंस, सर्व्हेलन्स आणि रिकॉनिसन्स (ISR) कार्यांसह विविध अनुप्रयोगांसाठी विकसीत केले आहेत.