धर्मांतरणाला बळी पडलेल्या पालघर जिल्ह्यातील ५० कुटुंबाीयांची हिंदू धर्मात घरवापसी

    10-Jan-2025
Total Views | 200
 
 Return Hinduism
 
पालघर : ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदू धर्मात  (Return Hinduism) वापसी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेमुळे हे शक्य झाले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरूषांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या मंदिरात दर्शणासाठी नेण्यात आले आहे.
 
त्यापैकी विक्रमगड तालुक्यातील १७ जणांची हिंदू धर्मात घरवापसी झाली. यामध्ये पाच कुटुंबांचा समावेश असल्याची माहिती पालघर जिल्ह्यातील नरेश मराड यांनी दिली आहे. धर्मांतरणाला बळी पडलेल्या हिंदूंचा पालघरमधील विठ्ठल मंदिराच्या समितीने त्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत करण्यात आला आहे.
 
यावेळी सोशल मीडियावर अनेकांनी धर्मातरणाला बळी पडलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी व्हावी यासाठी आवाहन करत आहेत. यावेळी हिंदू विश्वपरिषदेचे समरसता प्रमुख रविंद्र साळे, लिहिणे मॅडम, रेखा टाक, वालचंद जमादार आणि गोपाळ सुरवसे यांनी आपली उपस्थिती दाखवली होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121