मदरशात उपचारासाठी गेलेल्या हिंदू महिलेवर मौलानाने केले लैंगिक शोषण
08-Sep-2024
Total Views | 49
लखनऊ : एका मदरशात मैलाने एका हिंदू महिलेवर बलात्काराचा (Women Sexual Assault) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मौलानाचे नाव मन्सूर असून त्याने उपचाराच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवली होती. यामुळे पीडित महिला तिच्या आजारी असलेल्या मुलासाठी ताबीज आणण्यासाठी मदरशात गेली होती. त्यावेळी मौलानाने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मौलाना मन्सूरच्या पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी मुसक्या आवळल्या आहेत.
प्रसारमाध्यमानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाणे परिसरात घडली होती. येथील जलालनगर परिसरात एक मदरसा आहे. त्याठिकाणी त्यात मौलाना मन्सून विद्यार्थ्यांना शिकवतात. भूत-भ्रष्टाच्या नावाखाली तो लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत होता. याला एक हिंदू महिला बळी पडली गेली. तिचा मुलगा अजारी असल्याने पीडितेने आपल्या मुलाला मंगळवारी मदरशात उपचारासाठी नेले असता मौलानाने पीडितेला सांगितले की, तिच्या मुलाला भूताने पछाडले आहे.
यावेळी मौलानाने पीडितेला उपचारासाठी विनवणी केली होती. त्यावेळी मौलानाने ७ प्रकारची मिठाई आणण्यास सांगितले. य़ासोबतच मन्सूरने लवंग आणि जायफळही आणायला सांगितले आणि पीडितेला नग्न व्हायला सांगितले. त्यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता मौलानाने सांतापून पीडितेवर अत्याचार केला असून हे प्रकरण सांगितले तर जीवे मारण्याच धमकी देण्यात आली होती.
यावेळी पीडित महिलेने ११२ या क्रमांकावर संपर्क करून पोलिसांशी संपर्क करत घटनास्थळी पोहोचून मौलानाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतले असून मौलानाला अटक करण्यात आली. तसेच मौलानावर भारतीय न्यायसंहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.