"मध्य प्रदेशात झालेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरणात काँग्रेसचे राजकारण"

    06-Sep-2024
Total Views | 23

Girl Sexual Assault
 
उज्जैन : एका महिलेचा पादचारी रस्त्यावर लैंगिक अत्याचार (Girl Sexual Assault) केल्याची घटना मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात घडली आहे. यावेळी पीडितेवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे काँग्रेस आणि भाजपात वादाची ठिणगी पेटली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मतदारसंघात हा गुन्हा घडला असून निदर्शनास आणून देत विरोधी पक्षाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल केले आहेत. तर भाजपने काँग्रेस याप्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा दावा करत आहे.
 
सध्या मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. विरोधी आणि भाजपात कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मतदारसंघातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणात आता पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बुधवारी उज्जैनमधील वर्दळ असलेल्या चौकांपैकी एका फाटकाजवळील फूटपाथवर महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. यावेळी घडलेल्या प्रकरणाविरोधात कोणीही हस्तक्षेप केला नाही.
 
उज्जैन येथील पोलीस अधीक्षक म्हणाले की, गुरूवारी ३.३० वाजता एक महिला पोलीस ठाण्यात आली आणि तिने बलात्कार झाल्याची तक्रार केली. ताबडतोब एका महिला अधिकाऱ्याला बोलावण्यात आले, तिची तक्रार नोंदवण्यात आली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर एफआरआय नोंदवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात आला असून, तो पोलिसांपर्यंत पोहोचवल्याचेही त्यांनी सांगितले. तो व्हिडिओ या घटनेचा पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
याप्रकरणात आरोपी लोकेश लाहोरीयाने महिलेला जबरदस्ती करत मद्य पाजण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगितले. यानंतर महिलेला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचरा पेटीच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचार केल्यानंतर तो तिला धमकावून पळून गेला. याचप्रकरणात आता काँग्रेस सत्ताधारी पक्ष भाजपवर टीका करत आहे. याविरोधात भाजपने सर्व आरोप धुडकावून लावत काँग्रेस राजकारण करत असल्याचा दावा भाजप करत आहे.
 
"काँग्रेस राजकारण करतंय"
 
या घडलेल्या घटनेला काँग्रेस राजकीय रंग देत आहे. प्रदेश काँग्रेस अध्य़क्ष जितू पटवारी म्हणाले की, आर जी कर बलात्कार हत्येवरून देशभरात भाजपचा विरोध होत असताना मध्य प्रदेशात मुख्य़मंत्र्यांच्या उपस्थित फूटपाथवर अत्याचार होतो. पुढे पटवारी म्हणाले की, मध्य प्रदेशात दररोज महिलांवर बलात्काराचा आरोप होतोय. मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात असे घडले आहे.
 
तसेच समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान या कट्टरपंथी नेत्याने अयोध्येत एका युवतीवर अमानुष अत्याचार केले. यावेळी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी नेते गप्प का राहिले? असा सवाल भाजपने केला असता अनेकजण मूग गिळून गप्प आहेत.
 
तसेच कोलकाता येथे आर जी कर प्रकरणात सारा देश रस्त्यावर आला. त्यावेळी काँग्रेसने पं.बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना का विरोध केला नाही? असा प्रश्न केला. तृणमूल काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्यात देशपातळीवर युती आहे. त्यांच्या या राज्यात कधीच अशा घटनांविरोधात काँग्रेस एक अक्षरही काढत नसल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. काँग्रेस याप्रकरणावर राजकारण करत असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121