आनंदवार्ता! एकट्या महाराष्ट्रात तब्बल 'इतके' टक्के परकीय गुंतवणूक
उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
06-Sep-2024
Total Views |
मुंबई : देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे. गेली दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे.
अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!
गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा… pic.twitter.com/8XT2n7e0w2
एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७० हजार ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच त्यांनी इतर राज्यांतील गुंतवणुकीची आकडेवारीही दिली. ती पुढीलप्रमाणे...
दुसर्या क्रमांकावरील कर्नाटक (१९०५९ कोटी)
तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (१०.७८८ कोटी),
चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (९०२३ कोटी),
पाचव्या क्रमांकावरील गुजरात (८५०८ कोटी),
सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (८३२५ कोटी),
सातव्या क्रमांकावरील हरयाणा (५८१८ कोटी),
आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (३७० कोटी),
नवव्या क्रमांकावरील राजस्थान (३११ कोटी)
मात्र, या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी ७९ हजार ७९५ कोटी म्हणजेच ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे.