आर जी कर अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेच्या आई वडिलांना लाच देण्याचा प्रयत्न

    05-Sep-2024
Total Views | 26
 
R G Kar Medical College
 
कोलकाता : आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर  अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
 
पोलिसांनी सुरूवातीपासून हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी दाखल करत असताना आम्हाला पोलीस ठाण्यात थांबावे लागले होते. ९ ऑगस्ट रोजी आर जी कर प्रकरणात मारल्या गेलेल्या ३२ वर्षीय डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले.
 
 
 
जेव्हा मृतदेह आमच्या ताब्यात आला तेव्हा एका वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी दिलेली लाच आम्ही नाकारली होती. दरम्यान याप्रकरणात कोलकाता आणि प. बंगाल राज्याच्या इतर काही भागांमध्ये निदर्शने सुरूच असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री 'रिक्लेम द नाईट' ही मोहीम राबवून असंख्य महिला याप्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. काही प्रशिक्षण डॉक्टरांच्या पालिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
 
पं.बंगालमध्ये या घटनेचा विरोध केला जात आहे. विधानसभेने मंगळवारी एकमताने बलात्कारविरोधी विधेयक मंजूर केले ज्यामध्ये पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीची शिक्षा द्याली लागेल तसेच इतर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा प्रस्ताव आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121