"मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली..."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    05-Sep-2024
Total Views | 428
 
Shinde & Thackeray
 
मुंबई : बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे. परंतू, आता मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्व्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेब असताना दिल्लीतील आणि देशभरातील मोठमोठे नेते इकडे येत होते. पण आता मला मुख्यमंत्री बनवा, असं म्हणण्यासाठी यांना दिल्लीच्या गल्लोगल्ली जावं लागतं. ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती होते. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांना पुढे नेत आहोत. आम्ही राज्यालासुद्धा पुढे नेत असून अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत. राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचं ध्येय आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  गिरीष महाजन महाजनांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, "देशमुखांनी मला सांगितलं की..."
 
मालवण दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. यामध्ये कुणालाही क्षमा नाही. सरकार कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे जे लोकं अफवा पसरवतात त्यांना मोठी चपराक मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. परंतू, त्याचं राजकारण करणं हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा करण्याकरिता प्रयत्न करत आहोत," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121