जगन्नाथ पुरी मंदिराच्या तुपाची तपासणी करणार

तिरूपती येथील लाडूच्या वादानंतर प्रशासनाचा निणर्य

    26-Sep-2024
Total Views | 51

ghee
 
भुवनेश्वर :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन रेड्डींवर तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ केल्याचा आरोप केला होता. प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळण्यात आल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराने मोठा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर यांनी सांगितले की, “जगन्नाथ पुरी मंदिराला जे तूप पुरवले जाते, त्याचीही तपासणी करणार आहोत. आम्ही याबाबत दूध संघाला कळवले आहे,” असे त्यांनी सांगितले.

जगन्नाथ पुरी हे कृष्णाचे पवित्र मंदिर आहे. लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या तुपाचा पुरवठा केला जातो, ते तूप शुद्धच असले पाहिजे, असे आम्ही आधीच पुरवठा करणार्‍या दूध संघाला बजावले आहे. मात्र, तिरुपती मंदिर प्रसाद लाडू प्रकरणात जी माहिती समोर आली, त्यानंतर आम्ही आता तूप तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

जगन्नाथ पुरी मंदिरात जो प्रसाद तयार केला जातो, त्यासाठी चुलीसाठी लाकडांचा वापर केला जातो. तसेच, यातला मुख्य घटकपदार्थ हा तूप आहे. प्रसाद तयार झाल्यानंतर आधी त्याचा नैवेद्य भगवान जगन्नाथ, देवी बिमला यांना दाखवण्यात येतो. त्यानंतर या प्रसादाचा महाप्रसाद होतो. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जशी भेसळ झाली, तशी भेसळ तुपात असू नये, म्हणून जे साठवून ठेवलेले तूप आहे त्याची आणि मागवले जाणार्‍या तुपाची चाचणी करण्यात येणार आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121