पिरामल फार्माचे कर्ज नीच्चांकी पातळीसह २ अब्ज डॉलर महसूल लक्ष्य!

    26-Sep-2024
Total Views | 21
piramal pharma company revenue target


मुंबई : 
   फार्मास्युटिकल क्षेत्रातील कपंनी पिरामल फार्माने आगामी काळात महसूलात दुप्पट वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२९-३० पर्यंत अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन(EBITDA) मार्जिनचे लक्ष्य २५ टक्के इतके असेल, असे पिरामल फार्माच्या अध्यक्षा नंदिनी पिरामल यांनी म्हटले आहे.

पिरामल फार्मा कंपनीचे निव्वळ कर्ज १ पटावर आणण्याची घोषणादेखील केली असून महसूल दुप्पट करून २ अब्ज डॉलर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, कंपनीचा EBITDA तिप्पट होईल आणि २०३० पर्यंत कंपनीचे निव्वळ कर्ज सध्याच्या २.९ पट EBITDA पातळीवरून १ पट कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये ९ टक्क्यांनी वधारल्यानंतर पिरामल फार्मा कंपनीचा समभाग बीएसईवर २२७ रुपयांवर बंद झाला.

आर्थिक वर्ष २०३० पर्यंत २५ टक्के EBITDA मार्जिनसह १.२ बिलियन डॉलर कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, त्याचा क्रिटिकल केअर व्यवसाय उभ्याने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत २५ टक्के EBITDA मार्जिनसह ६०० दशलक्ष डॉलर महसूल गाठू शकेल आणि ग्राहक आरोग्य सेवा व्यवसाय एबिटा मार्जिनसह २०० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचू शकेल, असा अंदाज कंपनीने वर्तविला आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121