लक्झरी व्हिला रेंटल कंपनीचा IPO आला! 600 कोटींचं ठेवलं लक्ष्य!

    23-Sep-2024
Total Views |
luxury villa rental company


मुंबई : 
   लक्झरी व्हिला रेंटल कंपनी स्टेयस्टा आगामी काळात आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करावयाची आहे. २०२८ पर्यंत कंपनी आयपीओ लाँच करण्याची योजना आखत असून ६०० कोटींच्या आसपास कंपनीचे महसूल लक्ष्य असणार आहे. लक्झरी व्हिला भाडे क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी स्टेवीस्टा लवकरच आयपीओ आणणार आहे.
 

 

दरम्यान, कंपनी सध्या देशभरात १ हजार मालमत्ता हाताळत असून पुढील अडीच वर्षांत २ हजार ५०० व्हिलापर्यंत पोर्टफोलिओ वाढवण्याची त्यांची योजना आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये १४० कोटी रुपयांचा महसूल कंपनीने मिळविला असून पहिल्या तिमाहीत EBITDA कामगिरीदेखील सकारात्मक आहे. ४२.२ कोटी रुपयांचा महसूल आणि १ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

आम्ही गेल्या सात वर्षांत केवळ ३० कोटी रुपयांच्या भांडवलासह अत्यंत भांडवली कार्यक्षमता दाखवली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी १९६ कोटी रुपयांचा महसूल आणि ४ कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे, असे स्टेविस्टाचे सह-संस्थापक अमित दमानी म्हणाले. भारतातील सुट्टीच्या मोसमातील भाडे बाजार २०२४ पर्यंत २.१२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून २०२९ पर्यंत ८.७२ टक्के वार्षिक वाढीसह ३.२२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121