नितेश राणे हिंदूत्वादी नेते! कळवळीने हिंदूत्वाचे विषय मांडतात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    20-Sep-2024
Total Views |
 
Rane & Fadanvis
 
मुंबई : नितेश राणे हे हिंदूत्वादी नेते असून ते कळवळीने हिंदूत्वाचे विषय मांडतात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. भाजप आमदार नितेश राणेच्या वक्तव्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अजितदादांनी कोणाकडे तक्रार केली हे मला माहिती नाही. पण नितेश राणे हे हिंदुत्वासाठी काम करतात आणि ते हिंदूत्ववादी आहेत. ते अतिशय कळवळीने हिंदूत्वाचे विषय मांडतात. हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यासंदर्भात नारायण राणे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली. मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते निश्चितपणे याबद्दल काळजी घेतील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  राऊत बावळट मुलासारखं बोलू नका! बच्चू कडूंनी दिला दम!
 
महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "विरोधी पक्षनेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे. माहिती न घेता बोलायचं आणि महाराष्ट्राची बदनामी करायची, हे त्यांनी बंद करायला हवं. आज त्यांना अक्षरश: तोंडावर पडावं लागलं. कारण जी कंपनी बाहेर गेली असं ते म्हणाले होते त्या कंपनीने आता स्वत: यावर खुलासा केला आहे," असे त्यांनी सांगितले.