दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ झळकणार मराठी रुपेरी पडद्यावर

    18-Sep-2024
Total Views | 77
पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट "रानटी"
 
 
sharad kelkar
 
मुंबई : जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून... "काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!
 
चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यावरुन ‘रानटी’ चित्रपट हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला असेल असे जाणवते. शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा कलाकार. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,'अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड यांची असून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121