मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sardar Patel Insult News) उत्तर प्रदेशाच्या बरेली येथे इस्लामिक कट्टरपंथींनी ईद-ए-मिलादच्या जुलूसदरम्यान भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान केल्याचे निदर्शनास आले आहे. जुलूसवेळी ८ ते ९ जण पायातल्या चपला न काढता सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर उभ्या राहिल्या. सरदार पटेल यांच्या अपमानामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हरिपाल सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी सकाळी नवाबगंज मार्केटमधून ईद मिलाद-उन-नबीचा जुलूस काढण्यात आला. यात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. जुलूसच्या मार्गातच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा आहे. जुलूस जसा पुढे सरकला तेव्हा ७ ते ९ इस्लामिक कट्टरपंथींनी चपला न काढताच पुतळ्याच्या चौथाऱ्यावर चढल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी या घटनेती दखल घेतली आहे.