मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विविध कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. त्यातच आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओला मोठा प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे. दरम्यान, बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ दि. १६ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख बाजारात लिस्ट झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना २१४ शेअर्सच्या लॉटसाठी १४,९८० रुपये गुंतवावे लागले.
दरम्यान, कंपनीचे लिस्टिंग झाल्यानंतर बजाज ग्रुपच्या आयपीओने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. विशेष म्हणजे आज मार्केटमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. तसेच, या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना तब्बल ११४.२९ टक्के परतावा मिळाला आहे.
तब्बल तीन दशकांनंतर निघालेल्या बजाज कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये याची लिस्टिंग १४५ रुपयांवर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच, प्राईस बँडच्या तुलनेत १०७ टक्के प्रीमियम दाखविले. परिणामी, आयपीओ ग्रे मार्केटपेक्षा जास्त प्रीमियमसह बाजारात दाखल झाला आहे.