सांगली : येणाऱ्या निवडणूकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही चाबकाने फोडून काढणार आहे, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला. सांगलीतील शिराळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "सरकार बदलल्यामुळे शेतकऱ्याची वीजेची थकबाकी माफ केली. त्याला कर्जमाफी दिली. दुधाला ५ रुपये अनुदान दिलं. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीतून गोरगरिबाला १० हजारांपासून तर १५ लाखांपर्यंत मदत मिळू लागली आणि यूतीच्या सरकारमुळे माय माऊलीच्या खात्यावर १५०० रूपये यायला लागलेत. पवार साहेब माज तुम्हाला आला होता. म्हणून येणाऱ्या निवडणूकीत तुमच्यासारख्या वळू रेड्याला फोडून काढायला गावगाड्यातला शेतकरी खुंटीवरचा चाबूक खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. महाविकास आघाडीच्या वळू रेड्यांना आम्ही चाबकाने फोडून काढणार आहे. तुम्ही शकुनी मामासारखा कितीही डाव टाका, पण आम्ही आता थांबणार नाही," असे ते म्हणाले.