डॉक्टरांच्या आंदोलनामुळे, संपामुळे त्रस्त जनतेची थोडी जरी काळजी ममता यांना असती, तर त्यांनी डॉक्टरांची मागणी मान्य केली असती. मात्र, ममता यांनी डॉक्टरांच्या मागणीला नकार दिला आणि बैठक फिसकटली. आता यावरून ममता म्हणत आहेत की, जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे.
काल-परवा डॉक्टरांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत ज्युनियर डॉक्टरांची बैठक होती. डॉक्टर म्हणाले की, बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण व्हावे. ममतांनी याला नकार दिला. ममता यांना कसली भीती वाटली? कर नाही तर डर कशाला? डॉक्टरांच्या आंदोलनामुळे, संपामुळे त्रस्त जनतेची थोडी जरी काळजी ममता यांना असती, तर त्यांनी डॉक्टरांची मागणी मान्य केली असती. मात्र, ममता यांनी डॉक्टरांच्या मागणीला नकार दिला आणि बैठक फिसकटली. आता यावरून ममता म्हणत आहेत की, जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र, प. बंगालची आणि त्यातही तृणमूल काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहाता, प. बंगालमधल्या त्या निष्पाप डॉक्टर युवतीच्या हत्येवरून जनतेचे लक्ष उडावे, यासाठीच त्या असे म्हणत असतील, असे वाटते.
एक महिना प. बंगालमध्ये आंदोलन सुरू आहे. वैद्यकीय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. महिला मुख्यमंत्री असताना एका डॉक्टर युवतीवर इतका भयंकर हल्ला, बलात्कार होतो, इतका निर्घृणपणे तिचा खून होऊ शकतो? यामुळे सगळीकडे उद्विग्नता पसरली होती. त्यामुळे प. बंगालची हिंदू जनता संविधानाची न्याय-हक्काची भाषा करू लागली. ममतांच्या दडपशाहीला न जुमानता, आवाज उठवू लागली. ममता यांची दडपशाही जनता सहन तरी किती करणार? मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी कायम हिंदूविरोधी बोलणे भूमिका घेणे, हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अपमान करणे, कुणी रामनाम जरी घेतले तरी संतप्त व्हावे, नक्षलवादी परिसरात जाऊन मतांची भीक मागावी, एक ना अनेक. ममता यांच्या राज्यात हिंदूंची अवस्था दुय्यम नागरिकांसारखीच होती. मागे संदेशखाली प्रकरणात तर तृणमूलच्या गुंडानी मागासवर्गीय भगिनीवर अनन्वित अत्याचारही केले होते. पण ममता गप्पच. ममतांची दडपशाही किती तर भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले होते की, प. बंगालचा दौरा करत असताना अनेक ठिकाणी त्यांना राहायला हॉटेल उपलब्ध झाले नाही, दीदीला समजले तर, हॉटेल बंद पाडेल. त्यापेक्षा कृपया तुम्ही इथून जा. असे सांगणारे हॉटेलवाले त्यांना राज्यभर भेटले. तर अशा मग्रूर ममता स्वतःहून राजीनामा द्यायचे म्हणत आहेत. तरीही निष्पाप डॉक्टरच्या खुनाची जबाबदारी तर घ्यावीच लागेल. मुख्यमंत्रिपद भोगले, आता जनता देऊ पाहणारा तापही भोगावा लागेल.
राशिद आणि योगायोग
“ ‘कलम ३७०पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन ‘इंडी’ आघाडीने दिले, तर काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देईन,” असे खा. इंजिनिअर राशिद याने म्हटले. कोण हा इंजिनिअर राशिद, तर इंजिनिअर राशिदचे खरे नाव शेख अब्दुल राशिद असून तो जम्मू-काश्मीर अवामी इत्तेहाद पार्टीचा संस्थापक आहे. २०१९ राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)‘टेरर फंडिंग’च्या गुन्ह्याखाली ‘युएपीए’ कायद्यांतर्गत राशिदला अटक केली. तेव्हापासून तो तिहार तुरुंगात होता.
‘एनआयए’च्या मते इंजिनिअर राशिद फुटीरतावादी आहे. अनेक सार्वजनिक मंचांवरून त्याने लोकांना देशाविरोधात भडकावले. जम्मू-काश्मीरमध्ये भारतविरोधी दहशतवादी समूहांचा मंच ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’ (यूजेसी) याला वैधता मिळावी, असे त्याचे म्हणणे होते. राशिद हा ‘जेकेएलएफ’च्या माध्यमातून पैसे गोळा करत होता. काश्मीर खोर्यामध्ये राष्ट्रविरोधी कारवाया वाढाव्या, यासाठी कुरिअरच्या माध्यमातून हे पैसे पुरवले जायचे, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे. हे सिद्ध करण्याजोगे त्यांच्याकडे पुरावेही होते. तर असा हा राशिद लोकसभा निवडणुकीमध्ये बारामुल्ला मतदारसंघातून अपक्ष उभा राहून निवडणूक जिंकलाही. अर्थात, या क्षेत्रात हिंदूंची लोकसंख्या कमी आणि भूतकाळात इथे सातत्याने दहशतवादी कृत्याची पार्श्वभूमी आहे.
राशिदला सध्या तुरुंगातून जामीन मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्याक्षणीच त्याने मोदी आणि भाजपविरोधी गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्याला काश्मीरमध्ये ‘कलम ३७०हवे आहे. ‘कलम ३७०सार काश्मीरमध्ये दुसरे संविधान, दुसरा झेंडा होता. हिंदूंना आणि भारतीयांना दुय्यम नागरिकत्व आणि मागासवर्गीयांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. तर असे ‘कलम ३७०राशिदला पुन्हा काश्मीरमध्ये लागू करायचे आहे. त्यासाठी ‘इंडी’ आघाडीने समर्थन करावे, असे त्याचे मत. काँग्रेस आणि फुटीरतावादी मंडळी काश्मीरमध्ये ‘कलम ३७०हटवले, यावरून नाराज आहेत. या पक्षांचा, या संस्थांचा, या लोकांचा आणि राशिदसारख्या टेरर फंडिंगमध्ये सामील असलेल्या गुन्हेगाराचे मत, विचार जुळतात, हा योगायोग आहे का?