"वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!"

किरीट सोमय्यांची संजय राऊतांवर टीका

    12-Sep-2024
Total Views | 83
 
Sanjay Raut
 
मुंबई : वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
हे वाचलंत का? -  मविआचं १२५ जागांवर एकमत : विजय वडेट्टीवार
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायाचा आणि हिंदूत्वाचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात. अमित शहा दर्शन लालबागच्या राजाचे करतात आणि संजय राउत उर्फ उद्धव ठाकरे हे त्याचा निषेध करतात. वोट जिहादसाठी आणि मुस्लीम मतांसाठी अशा प्रकारे गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121