आरबीआयने 'या' बड्या खाजगी बँकांना लावला कोटींचा दंड
11-Sep-2024
Total Views | 104
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने देशातल्या दोन आघाडीच्या खाजगी बँकांवर दंड आकारला आहे. विविध नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून बँकांना दंड आकरण्यात आला आहे. दि. ०३ सप्टेंबर रोजी अॅक्सिस बँकेला १.९१ कोटी तर एचडीएफसी बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून बँकांनी नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
दरम्यान, बँकांनी पात्र नसलेल्या खातेदारांसाठी बचत खाती उघडली असून याव्यतिरिक्त बँक आपल्या ग्राहकांना युनिक कस्टमर आयडी(यूसीआयसी) प्रदान करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आरबीआयने दोन्ही बँकांवर ठेवला आहे. आरबीआयने केलेल्या बँकेच्या दि. ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या आर्थिक स्थितीच्या आधारे तपासणी करताना बँकेकडून अनेक बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पात्र नसलेल्या खातेदारांसाठी बँकेकडून बचत खाती उघडली आहेत. याव्यतिरिक्त, बँक आपल्या ग्राहकांना युनिक कस्टमर आयडी (यूसीआयसी) प्रदान करण्यात अपयशी ठरली असताना १.६० लाखांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता योग्यरित्या सुरक्षित केली नाही, असेही आरबीआयने दंड आकारणी करताना म्हटले आहे. ॲक्सिस बँकेला 'ठेवीवरील व्याज दर', 'केवायसी' आणि 'कृषी क्रेडिट प्रवाह - तारण नसलेली कृषी कर्जे' यासारख्या नियमांचे पालन न केल्याबद्दल १.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.