दुर्गा मातेच्या मंदिरासमोर लावला इस्लामिक ध्वज, झारखंडमध्ये ताणावाचे वातावरण
11-Sep-2024
Total Views | 34
रांची : झारखंडच्या गिरीडीह येथे एका दुर्गा मातेच्या मंदिरासमोर इस्लामिक ध्वज (Islamic Flag) लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. सारिया पोलीस ठाणे परिसरात पोलिसांनी हे प्रकरण हाताळले गेले. यावेळी इस्लामी ध्वज हटवण्यात आला असून तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले.
प्रसारमाध्याने दिलेल्या माहितीनुसार, सरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत केश्वरी येथील दुर्गा मंडप येथे इस्लामी ध्वज लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी इस्लामी ध्वज झळकवले. यावेळी अनेक दुर्गा मंडळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी गोधळ घालण्यास सुरूवात केली आहे.
याप्रकरणाची माहिती मिळताच, एसडीपीओ धनंजय राम यांनी पोहोचून घटनास्थळी असलेल्या जमावाचे कान शेकले. यावेळी भाजप अध्यक्ष अजय यादव की, या प्रकरणात २१ जणांची नावे असून पोलिसांनी अर्ज देण्यात आला आहे. या सर्वांना दोन दिवसात अटक न केल्यास ग्रामस्थ पोलीस ठाण्यास घेराव घालून तणाव निर्माण करतील. याचपार्श्वभूमीवर पोलीस पुढील तपास करत आहेत.