पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती पुढे आली आहे. शरद पवारांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. त्यासाठी अनेक भेटीगाठीही वाढल्या आहेत. यातच आता अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विलास लांडे यांचे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे ते शरद पवार गटात गेल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.