बांगलादेशातील हिंदू हिंसाचाराबद्दल केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
09-Aug-2024
Total Views | 168
नवी दिल्ली (Bangladesh Attack) : बांगलादेशी हिंदूंवर आंदोलनाच्या नावाखाली कट्टरपंथींनी हल्ले केले आहेत. बांगलादेशी हिंदू महिला, हिंदू युवती तसेच लहान मुलांवर हिंसा केली आहे. हिंदूंची घरे, मंदिरे जाळण्यात आली आहेत. शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर आता बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात ८ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित सरकार स्थापन करण्यात आले आहे. हिंदूंवर होत असलेल्या आत्याचाराचा भारत सरकार जाब विचारेल अशी स्थिती आता निर्माण होऊ शकते. यावर आता मोदी सरकार मोठे पाऊल उचणार असल्याची शक्यता आहे.
देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाहांनी (Amit Shah) बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अन्याय आणि आत्याचाराबाबत एक समिती स्थापन केली आहे. यामुळे बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर अमित शाहा मोठे पाऊल उचलणार आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या आणि त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अमित शाहांनी बांगलादेशातील सरकारसोबत समन्वय साधणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अमित शाहांचा मोठा निर्णय
त्यांनी लिहिले की, " बांगलादेशात हिंदूवर सध्या हिंसा सुरू आहे. ही वास्तव परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेशातील सीमेवर पाळत ठेवण्यासाठी एक समिती निवडली आहे. ही समिती बांगलादेशच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. या समितीचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी करतील.”, असे अमित शाहांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, बांगलादेशात नोबोल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. देशातील हिंदूंवरील आत्याचार होत आहे, ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात येईल, असे नरेंद्र मोदींनी प्रतिपादन केले.