कल्याणकारी योजना तरुणांना रोजगार...; मुख्य आर्थिक सल्लागारांचे महत्त्वाचे विधान!

    07-Aug-2024
Total Views | 26
cea v anantha nageswaran on


नवी दिल्ली :       रोजगारनिर्मितीकरिता असलेल्या कल्याणकारी योजना देशातील तरुणांना रोजगार शोधण्यापासून रोखत आहेत का याचा अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांनी केले आहे. ‘द स्टेट ऑफ रूरल युथ एम्प्लॉयमेंट रिपोर्ट २०२४’ लाँच करताना कोविडनंतरच्या गिग अर्थव्यवस्थेवरील डेटावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशातील नोकरदारवर्ग अधिक औपचारिक होण्याऐवजी अधिक अनौपचारिक झाला आहे का, हे निर्धारित करण्यासाठी गिग अर्थव्यवस्थेसंदर्भातील डेटा विचारात घ्यायला हवा. तरुणांच्या श्रमाचा पुरवठा करण्याच्या इच्छेनुसार विशिष्ट वर्तनात्मक परिणाम युएस आणि युरोपमध्ये केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच युनायटेड स्टेट्समधील दोन राज्यांमध्ये केलेल्या प्रायोगिक अभ्यासात सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाचा पर्याय लागू केल्याने कामगारांचा पुरवठा कमी झाला आहे.

ते म्हणाले की, बेरोजगारी पाहताना त्यातील किती अनैच्छिक आणि किती ऐच्छिक बेरोजगारी आहे हे शोधणे गरजेचे आहे. कल्याणकारी योजना तयार करताना लोकांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग कसा वाढेल, यावर भर दिला जातो. तसेच, या सहभागामुळे आर्थिक घडामोडी सरकारच्या बाहेर घडतात, सरकारच्या आत नाही. त्यामुळे आपल्या कल्याणकारी योजनांवर काम करून त्या अधिक सुलभ केल्या पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले.






अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121