कोण आहेत मोहम्मद युनूस ज्यांच्या हाती बांगलादेशच्या सत्तेच्या चाव्या?
07-Aug-2024
Total Views | 135
ढाका (Muhammad Yunus) : बांगलादेशातील मोठ्या राजकीय उलथापलथीनंतर नव्याने अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या अंतरिम सरकारची सूत्रे ही नोबेस पारितोषिक विजेते मोहम्मद सुनूस यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच बांगलादेशात काही दिवसांपासून बांगलादेशी विद्यार्थ्यी आंदोलन करत होते. मात्र आता त्याच विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांच्या हाती अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत विद्यार्थी नेत्यांसह तिन्हा सेना प्रमुखांनीही हजेरी लावली होती. गरिबीशी लढा देणारे 'कर ऑफ द पुअर' म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद युनूस हे अंतरिम सराकरचे मुख्य सल्लागार म्हणून ते विद्यार्थ्यांची पहिली पसंती होते. युनूस हे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक होते. शेख हसीनांनी देश सोडून जाण्यामागचे युनूस हे कारणीभूत असल्याचे नाकारता येत नाही.
बँकर ऑफ द पुअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनूस यांना २००६ साली शांततेचा नोबेल पारितोषिक पुरस्कार मिळाला. कारण त्यांनी ग्रामीण भागातील गरिबांना १०० डॉलर्सपर्यंत कमी कर्ज देऊन लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले होते. गरिब जनतेला कोणत्याही बँकांतून कोणतीही मदत मिळू शकली नव्हती. त्यामुळे युनूस यांनी ही शक्कल लढवून गोरगरिबांसाठी आर्थिक मदतीचा नवा मार्ग खुला करू दिला आहे.