चिंता वाढली! 'जमात-ए-इस्लाम'चा बांगलादेशात नंगानाच; हिंदू माता-भगिनींवर अत्याचार
07-Aug-2024
Total Views | 112
ढाका (Bangladesi Hindu Violence) : बांगलादेशात शेख हसीनांचे सरकार गेले तरीही हिंसक वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी हिंदूंवर हल्ले होत असून काही मृत्युमुखी पडले आहेत. तर कट्टरपंथीयांनी हिंदू आई-बहिणींवर हल्ले करून अब्र लुटण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदू मंदिरे, घरे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमासोबत बोलत असताना एका बांगलादेशी तरूणाने सांगतले की, "आम्हाला बांगलादेशातील काही लोकं मदत करत आहेत. मात्र काही कट्टरपंथी हल्ला करत आहेत. जीवे मारण्यासही मागे-पुढे पाहत नसल्याचे म्हणाले. तसेच जमात -ए-इस्लामी समूह बांगलादेशच्या रस्त्यावर बंदूक घेऊन फिरत असून ही हिंदूंसाठी चिंतेची बाब आहे."
जमात-ए-इस्लामी ही संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या घरांची, दुकांनांची यादी तयार करत आहेत. ही हिंसा रात्रीपासून सुरू आहे. या हिंसेमुळे बांगलादेशी हिंदू भयभीत आहेत. याप्रकरणात विश्व हिंदू महासंघ, बांग्लादेशने अपहरण झालेल्या तसेच अत्याचार झालेल्या महिलांची यादी जारी केली आहे. यामध्ये तीन हिंदू महिलांचा समावेश आहे. त्या तीन महिलांचेअपहरण केल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या बांगलादेशातील परिस्थिती पाहता, अनेक बांगलादेशी हिंदू आपले खरे नाव सांगत नाहीत. त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी पळूनही जाता येत नाही. जमात-ए-इस्लामी समूह रस्त्यावर बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. तसेच इंटरनेट कनेक्शन कापण्याचे काम केले जात आहे. यामुळे पीडित महिलांना आणि हिदूंना आपल्या कुटुंबाला, जवळच्या मित्रांना भेटता येत नाही.
दरम्यान, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याने बांगलादेशातील तुरूंगात असलेल्या २,२०० हून अधिक कट्टरपंथीयांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंची अवस्था आणखी बिकट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीबीसीच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की, जमात-ए-इस्लामी समूहाने जरी यादीत नाव नमूद केले नसले तरीही सुरक्षित राहण्याचे आवाहन तिच्या नातेवाईकांना दिले आहे.