विशाळगडावरुन कंदीलपुष्पाच्या नव्या प्रजातीचा शोध; महारांजाच्या नावे नामकरण

    06-Aug-2024
Total Views | 782
new species of ceropegia


मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
 
महाराष्ट्रात कंदीलपुष्पाच्या २६ प्रजाती सापडतात. त्यातील १७ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील 'सेरोपेजिया'च्या प्रदेशनिष्ठतेसाठी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यातल्या बहुतेक जाती दुर्मीळ असून काहीचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'ने (आययूसीएन) देखील अलीकडेच राज्यात आढळणाऱ्या कंदीलपुष्पाच्या काही प्रजातींना 'संकटग्रस्त' प्रजातींच्या लाल यादीत स्थान दिले आहे. अशा परिस्थितीत संशोधकांनी विशाळगडावरुन कंदीलपुष्पाच्या नव्या प्रजातीच्या शोध लावण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कंदीलपुष्पांच्या प्रजातींमध्ये भर पडली आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ अक्षय जंगम, डाॅ. शरद कांबळे, डाॅ. श्रीरंग यादव, रतन मोरे, डाॅ. निलेश पवार यांनी या प्रजातीचा शोध लावला आहे. यासंदर्भातील संशोधन वृत्त मंगळवारी 'फायटोटॅक्सा' या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले.
 
 
 
अक्षय जंगम आणि डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली. प्राथमिक निरीक्षणावेळी त्यांना ही प्रजात 'सेरोपेजिया सांतापावी' आणि 'सेरोपेजिया करुळेएन्सिस' या दोन प्रजातींशी साधर्म्य साधत असल्याचे वाटले. मात्र, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संशोधकांनी या प्रजातीची तुलना 'सेरोपेजिया लावी' या प्रजातीसोबत केली. त्यानुसार या नव्या प्रजातीचा उलगडा करण्यासाठी संशोधकांनी या प्रजातीच्या वेगवेगळ्या भागांची तुलना ही 'सेरोपेजिया लावी'सोबत केली. त्यानुसार 'सेरोपेजिया लावी' ही झुडूपवर्गीय वनस्पती असून 'सेरोपेजिया शिवरायीयाना' ही वेलवर्गीय आहे. शिवाय नव्या प्रजातीच्या दलपुजांचा (करोला) रंग, आकार, रचना यामध्ये देखील बराच फरक आहे. सध्यपरिस्थितीत तरी संशोधकांना ही प्रजात केवळ विशाळगडावर आढळून आली आहे.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का ?
या नवीन प्रजातीला महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवली. स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्व त्यांनी जाणले. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच त्यांनी राखीव केली. एवढेच नव्हे तर आज्ञापत्रात रयतेसाठी "गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न दयावी" असे आवाहन केले, यावरून छत्रपती शिवराय जैवविविधता संवर्धनाच्या बाबत किती अग्रेसर आणि काटेकोर होते हे लक्षात येते.
 
'सेरोपेजिया शिवरायीयाना'च्या दलपुजांचा (करोला) आकार आणि रचना ही 'सेरोपेजिया लावी'पेक्षा वेगळी आहे. नव्या प्रजातीचे 'करोला' हे एकमेकांना चिकटलेले आहेत. तसेच इतर प्रजातींच्या मानाने त्याचा आकार देखील मोठा आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात ही नवी प्रजात विशाळगडावर फुलते. तिची वेल साधारण २ मीटरपर्यंत लांब वाढते. गडावर या प्रजातीची संख्या मर्यादित असली, तरी आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये सुद्धा ही प्रजाती आढळण्याची शक्यता आहे. - अक्षय जंगम, वनस्पती संशोधक
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121