परदेशी पर्यटकांची भारताला पसंती, मागील पाच महिन्यात ९.१ टक्के वाढ!

    06-Aug-2024
Total Views | 30
foreign tourist indian priority


मुंबई :          देशांतर्गत पर्यटनवाढीसाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या आगमनात मोठी वाढ दिसून आली आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत परदेशी पर्यटकांचे प्रमाण ९.१ टक्के इतके दिसून आले आहे. त्याचबरोबर, याच कालावधीत परकीय चलनातील उत्पन्नात २२.५२ टक्के इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे.
 
दरम्यान, पर्यटन मंत्रालयाने मे महिन्यातील पर्यटनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मे २०२४ मध्ये देशात ६ लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले आहे. मागील वर्षात मे महिन्याच्या तुलनेत वाढ दिसून आली असून मे २०२३ मध्ये ही संख्या ५.९८ लाख इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.३ टक्के वाढ दिसून आली आहे.

जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत ४०.७२ लाख परदेशी पर्यटकांचे आगमन झाले. मागील वर्षी जानेवारी ते मे २०२३ मध्ये ही संख्या ३७.३२ लाख इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ९.१ टक्के वाढ झाली आहे. पर्यटनाच्या माध्मयातून सरकारला मे महिन्यात परकीय चलनाद्वारे १७,७६२ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. २०२३ च्या उत्पन्नाच्या तुलनेत ३.२३ टक्के वाढ झाली आहे.

आकडेवारीतील एकंदरीत पाहता, एकूण आर्थिक वाढ आणि देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासावरील सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन विकासात्मक धोरणांचा परिणाम परदेशी पर्यटकांचे आगमन आणि परकीय चलन उत्पन्नातील वाढ पर्यटन व्यवसायाचा विस्तार दर्शवित आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121