'ईएलआय'च्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
06-Aug-2024
Total Views | 44
मुंबई : रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना(ईएलआय) माध्यमातून रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजनेची त्वरित अमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय श्रम, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. ईएलआय योजना २ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने ईएलआय योजना आणि त्याच्या अंमलबजावणी आराखड्याचा आढावा घेताना डॉ.मांडविया यांनी नमूद केले की, ईएलआय योजनेचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी मजबूत यंत्रणेच्या महत्त्वावर भर दिला आहे. सरकारचे प्रयत्न शाश्वत आणि सर्वसमावेशक रोजगार परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने असणे अत्यावश्यक आहे. असे सांगताना नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे,"असेही ते म्हणाले.
देशात २ वर्षांच्या कालावधीत २ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करणे हे ईएलआय योजनेचे उद्दिष्ट असून रोजगाराच्या संधी वाढण्यास आणि उपजीविका वाढविण्यात मोठा हातभार लागेल. पुढील ५ वर्षांच्या कालावधीत ४.१ कोटी युवकांना रोजगार,कौशल्यविकास तसेच इतर संधी सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी २ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय निधीसह पाच प्रमुख योजना आणि उपक्रमांची यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.