धगधगत्या ब्रिटनची कहाणी...

    06-Aug-2024   
Total Views |
britain pm keir starmer govt


जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या नेतृत्वातील लेबर पार्टी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून ब्रिटनच्या रस्त्यावर हिंसाचाराच्या विविध घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. सातत्याने हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. मात्र, यावेळी झालेली निदर्शने ही गेल्या 13 वर्षांतील ब्रिटनमधील सर्वात मोठी दंगल असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर-पश्चिम इंग्लंडमध्ये तीन मुलींची चाकूने हत्या करण्यात आल्याने या हिंसाचाराच्या आगीने उग्र रूप धारण केले.

साऊथ पोर्टमधील एका व्यक्तीने सोशल मीडिया पोस्टमध्ये मुलींच्या हत्येमागे मुस्लीम स्थलांतरितांना जबाबदार धरले आहे. परंतु, सोशल मीडियावरील ही पोस्ट केवळ अफवा असल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोराला ब्रिटिश पोलिसांनी पकडले असून ब्रिटनमधील संतप्त लोक बेकायदेशीर स्थलांतरित आणि इस्लामिक कट्टरतावादापासून देशाला वाचवण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.

गेल्या शनिवारी लिव्हरपूल, मॅन्चेस्टर, सुंदरलॅण्ड, हल, बेलफास्ट आणि लीड्ससह अशा ठिकाणी अशांतता पसरली आणि आंदोलक व पोलीस यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. या हिंसाचारात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले. लिव्हरपूलमधील आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या, विटा फेकल्या. तसेच, परप्रांतीयांनी येथील काही हॉटेलच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या. आंदोलकांनी केलेल्या या दंगलीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण ब्रिटन हे ‘रेड अलर्ट’वर आहे. अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि गुंडगिरीची किंमत मोजावी लागेल, असा इशारा ब्रिटनचे गृहसचिव यवेट कूपर यांनी दंगेखोरांना उद्देशून दिला आहे. हिंसाचारावर कारवाई करत पोलिसांनी 100 जणांना अटक केली.

ट्विटरवर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ (प्रथम) दावा करतात की, मुस्लिमांनी शांततापूर्ण आंदोलकांना अनेक ठिकाणी चाकू आणि कुर्‍हाडीने धमकावले. ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये मुस्लीम गट रस्त्यावर हाहाकार माजवताना दिसत आहेत. मुस्लीम डिफेन्स लीगवर हिंसाचार घडवल्याचा आरोप आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका ब्रिटिश व्यक्तीला मुस्लिमांनी घेरून मारल्याचा दावा करण्यात आला होता. दुसर्‍या व्हिडिओमध्ये मुस्लीम पोलिसांवर हल्ला करताना दाखवण्यात आले आहेत. अनेक मुस्लीम आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर म्हणाले होते की, या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना कायद्याच्या पूर्ण ताकदीचा सामना करावा लागेल. पोलीस अटक करतील. रिमांडवर घेतले जाईल. शिक्षाही होईल. या गोंधळात थेट सामील झालेल्यांना नक्कीच पश्चात्ताप होईल. हा निषेध नसून संघटित हिंसक गुंडगिरी आहे, त्यामुळे ज्यांनी ऑनलाईन भडकावून पळ काढला, त्यांनाही पश्चाताप होईल, असेही ते म्हणाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दंगेखोर हे ‘इंग्लिश डिफेन्स लीगचे समर्थक’ आहेत, जो 2009 सालापासून मुस्लीमविरोधी निदर्शने आयोजित करणारा एक गट आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, लंडन, हार्टलपूल, मॅन्चेस्टर, मिडल्सबरो, हल, लिव्हरपूल, ब्रिस्टल, बेलफास्ट, नॉटिंगहॅम आणि लीड्ससह डझनहून अधिक शहरे अशांततेत अडकली आहेत. बर्मिंगहॅमच्या बाहेरील रॉदरहॅम शहरात शेकडो दंगेखोरांनी हॉलिडे इन एक्स्प्रेसमध्ये आश्रय शोधणार्‍यांवर हल्ला केला. तेव्हा सर्वात वाईट हिंसाचार घडला. हॉटेलच्या खिडक्यांना लाथ मारणार्‍या आणि जळत्या व्हीली बिनला आत ढकलणार्‍या हल्लेखोरांपासून हॉटेलचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना दंगल घडवणार्‍या पोलिसांवर विटांचा मारा करण्यात आला. काही तासांनंतर, दुसर्‍या गटाने टॅमवर्थमधील हॉटेलवर हल्ला केला. आंदोलनकर्ते इमिग्रेशन आणि अलीकडेच इंग्लिश चॅनेल ओलांडून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणार्‍या स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येचा फायदा इमिग्रेशनवर प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेत आहेत.

गेल्या महिन्याच्या निवडणुकीत हा एक मध्यवर्ती मुद्दा होता. माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ‘बेकायदेशीर स्थलांतरितांना’ रवांडा येथे पाठवून बोटी थांबवण्याचे आश्वासन दिले होते. सध्याचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ही योजना रद्द केली असली, तरी त्यांनी इतर युरोपीय राष्ट्रांसोबत काम करून आणि अयशस्वी आश्रय-शोधकांना काढून टाकण्याची गती वाढवून इमिग्रेशन कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान केयर स्टारर यांची ब्रिटनध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याकरिता पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक