गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! बजाज हाऊसिंग फायनान्ससह आणखी चार आयपीओ बाजारात येणार

    05-Aug-2024
Total Views | 51
bajaj housing finanace upcoming ipo


नवी दिल्ली :     बजाज हाऊसिंग फायनान्सने आयपीओकरिता दाखल केलेल्या कागदपत्रांना अखेर मंजुरी दिली आहे. दरम्यान, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) ने बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ७ हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ)ला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हाऊसिंग फायनान्स फर्म ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

दरम्यान, कंपनीला आयपीओद्वारे ४ हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याचा विचार करत आहे. तसेच, सार्वजनिक ऑफरमध्ये विक्रीची ऑफर देखील असेल. यासोबतच रेखा राकेश झुनझुनवाला-समर्थित बाजार स्टाईल रिटेलसह महाराष्ट्रस्थित नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) मानबा फायनान्स, अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि डिफ्यूजन इंजिनियर्स यांनाही गेल्या आठवड्यात सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121