उरण : एक लोप पावलेला स्वर्ग

    05-Aug-2024
Total Views | 126
uran wetland


उरणमधील पाणथळी (uran wetland) म्हणजे जैवविविधतेचा ठेवा. पक्षीअभ्यासकांसाठी स्वर्ग असलेला हा प्रदेश आता संकटात सापडला आहे (uran wetland). येथील पाणथळींवर सततचे होणारे अतिक्रमण पक्षी विविधतेच्या मुळावर उठले आहे. याच पाणथळी वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देणारा हा लेख. (uran wetland)


नवी मुंबई (नंदकुमार पवार) - उरण... अर्थात महाराष्ट्रातील सर्वात मोठे किनारपट्टीभागावर वसलेले पाणथळ क्षेत्र. जैवविविधतेने परिपूर्ण असे हे पाणथळ शेकडो प्रकाराच्या स्थलांतरीत व पक्ष्यांचा अधिवास आणि अतिशय समृद्ध असे खाजन क्षेत्र. ‘बीएनएचएस’च्या अभ्यासानुसार उरण तालुक्यातील पाणथळींवर दीडशेच्या आसपास वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
 
संपुर्ण उरण तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या पूर परिस्थितिचा इतिहास नाही. अगदी 26 जुलै, 2005 सालच्या पुरामध्ये देखील उरण तालुक्याला पुराची झळ बसली नव्हती. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कारण, विकासाच्या नावाखाली सखल भाग, खाजन क्षेत्रांवरील भरावामुळे स्थानिक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनधिकृतपणे होणार्या खाजन क्षेत्रावरील भरावाला आळा बसावा आणि स्थानिक मासेमार समाजाची रोजीरोटी व स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवास वाचविण्याच्या आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे.
 
 
 
पाणजे-डोंगरी पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी आम्ही 2018 साली माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली. ‘एमसीझेडएमए’ने (महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, सदरचे पाणथळक्षेत्र हे कांदळवनानी वेढलेले असल्यामुळे ते ‘सीआरझेड’च्या प्रथम क्षेणी वर्गात मोडते. भविष्यात येथे कोणताही विकास करताना संबंधीत प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. या निर्णयानंतर समाजकंटकांनी नैसर्गिक भरतीच्या पाण्याचे स्रोत बंद ठेऊन हे पाणी कुठल्याही परिस्थितीत पाणजे येथील पाणथळ क्षेत्रात शिरु नये म्हणून प्रयत्न केले. त्याचबरोबर सदर पाणथळ क्षेत्रात भेटी देणारे हौशी पक्षी निरीक्षक, स्थानिक मासेमार व ‘बीएनएचएस’सारख्या संस्थांच्या शास्त्रज्ञांना अटकाव करणे हे सर्व प्रकार सुरु केले. रात्री अपरात्री स्थानिकांच्या मदतीने कांदळवन कत्तल, सुख्या गवतास आग लावणे, पाणथळ क्षेत्रात आलेल्या पक्ष्यांना मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून पिटाळून लावने, पाणथळ क्षेत्रात आलेले भरतीचे पाणी पंपसेट लाऊन बाहेर सोडून ते सुखवणे, असे वेगवेगळे प्रकार करण्यात आले.
 
 
पाणजे - डोंगरी येथील पाणथळ का संरक्षित करावे?
- पाणजे-डोंगरी हे पाणथळ 289 हेक्टरवर वसलेले उपजत खाजन क्षेत्र व नैसर्गिक सखलभाग आहे.
- सदरचे क्षेत्र हे द्रोणगिरी नोडसाठी (2740 हेक्टर) पूरनियंत्रण क्षेत्र (हेश्रवळपस िेपवी) म्हणून ‘सिडको’ने आरक्षित केलेले आहे.
- होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे तेथील विस्थापित होणार्‍या स्तलंतरित पक्ष्यांना एक सक्षम पर्यायी अधिवास म्हणून ‘बीएनएचएस’ने पाणजे-डोंगरी पाणथळीची शिफारस केली आहे.
- उरण तालुक्यात साधारण चौसष्ठ गावातील मासेमार पारंपारीक पद्धतीने खाड्यामध्ये, कांदळवनात मासेमारी करतात. हे खाजणक्षेत्र म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी उदरनिर्वाहाचे एक प्रमुख स्रोत आहे.
 
 
 
लढ्यामधील यश
- पाणजे- डोंगरी (289 हेक्टर) पाणथळ क्षेत्र संरक्षित करण्याविषयी न्यायालय व सरकारी, प्रशासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद.
- घुतुम-उरण-पनवेल राष्ट्रीय महामार्ग- 348 येथील 12.5 एकर क्षेत्रावर कांदळवनांचे पुनरूज्जीवन करण्यास यश.
- जेएनपीटी टर्मिनल 4 येथे कांदळवनांचे पुनरूज्जीवन करण्यास यश.
- बोरीपाखाडी, द्रोणगिरीनोड उरण येथील 2.5 एकर कांदळवन क्षेत्रावर उरण नगरपरिषदेद्वारे स्थापित करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प दुसरीकडे हटविण्यात यश प्राप्त झाले.
 
 
(लेखक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहे.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121