शिवकालीन वाघनखांबाबत अनेक समकालीन पुरावे उपलब्ध

ठाण्यात उलगडला लंडनमधील वाघनखांचा मागोवा

    03-Aug-2024
Total Views | 30

wagh Nakhe
 
ठाणे : लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालया’तून महाराष्ट्रात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन पुराव्यांची जंत्रीच लंडनस्थित संकेत कुलकर्णी आणि इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी मांडली. ठाण्यात आयोजित ‘लंडनमधील वाघनखांचा मागोवा’ या व्याख्यानात या द्वयीने वाघनखे आणि शिवरायांचा इतिहास उलगडला.
 
यामुळे वाघनखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या काही इतिहासतज्ज्ञांसह विरोधकांचे दावे फोल ठरले आहेत.
ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे के. जी. जोशी कला व एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय आणि ‘इन्स्टिट्युट फॉर ओरिएंटल स्टडी’ यांच्यावतीने महाविद्यालयातील पाणिनी सभागृहात शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट रोजी संकेत कुलकर्णी आणि कौस्तुभ कस्तुरे यांचे संयुक्त व्याख्यान पार पडले.
 
यावेळी, विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक व्यासपीठावर तर श्रोत्यांमध्ये सुमेधा बेडेकर, डॉ. महेश पाटील, डॉ. नितीन जोशी, प्रा. रुपेश महाडिक, प्रा. सुभाष शिंदे, प्रा. नारायण बारसे, इतिहासप्रेमी निलेश सकट आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. प्रारंभी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी इतिहास का शिकावा यावर थोडक्यात विवेचन करून श्रोत्यांचे कुतुहल वाढवले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी जंगम यांनी केले.
 
सुरुवातीला कौस्तुभ कस्तुरे यांनी इतिहास काळातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन अफजलखानवधाची घटना भौगोलिक स्थानांसह श्रोत्यांसमोर विशद केली. यावेळी त्यांनी वाघनखांसंबंधी समकालीन पुरावे मांडताना शिवभारत, सभासदांची बखर यामधील संदर्भ श्रोत्यांसमोर उलगडले. संकेत कुलकर्णी यांनी वाघनखे सातार्‍यातून लंडनला कशी गेली, याचा उलगडा करताना ब्रिटिश कारकिर्दीतील अनेक दाखले दिले.
 
‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम’मधील नोंदीनुसार, डफ याचा नातू अड्रीयन ग्रॅट डफने ही वाघनखे 1971 मध्ये ‘हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालया’ला भेट दिली. 1860 सालच्या ‘द होमवर्ड मेल’, 1875 सालच्या ‘डंडी कुरियर’ आणि ‘1896 पिअरसन्स विकली’ या इंग्रजी वर्तमानपत्रात या वाघनखांचा उल्लेख आढळतो. त्या वस्तुसंग्रहालयात एकूण सहा वाघनखे आहेत.
 
इतिहासप्रेमी श्रोत्याकडून वाघनखांची महती
लंडनमधील वाघनखांचा मागोवा या व्याख्यानाच्या समारोपानंतर प्रश्नोत्तरावेळी श्रोत्यांमधील इतिहासप्रेमी निलेश सकट यांनी प्रत्यक्ष वाघनखे आणि बिचवा दाखवून शिवरायांच्या इतिहासाची महती सांगितली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121