लाठीचार्ज! अश्रुधूर... पीडितेच्या न्यायाहक्कांसाठी निघालेल्या 'नबन्ना मार्च'विरोधात ममता सरकारने दाखवली ताकद

    27-Aug-2024
Total Views | 48
west-bengal-kolkata-nabanna-abhiyan-protesters-climb-barricades


नवी दिल्ली :          पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी नबन्ना मार्च (नबन्ना मार्च) काढला आहे. दरम्यान, या नबन्ना मार्च बिल्डिंगकडे वळविला असता पश्चिम बंगाल सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. बंगाल सरकारने नबन्ना मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांकरवी लाठीचार्ज देखील केला आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील अत्याचार प्रकरणी आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून आले आहे.

 

दरम्यान, आंदोलकांना थांबवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने दमनकारी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा नबन्ना मोर्चा मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत पाण्याच्या तोफांचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या आहेत. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवरून थांबण्यास तयार नाहीत. आंदोलकांना हावडा ब्रिज ओलांडण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे दिसून आले आहे.



विशेष म्हणजे आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ 'छात्र समाजा'तर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. ‘छत्र समाज’ ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उदयास आलेली संघटना असून ममता सरकारने हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशांतता निर्माण करणाऱ्या उपद्रवी घटकांची गुप्तचर माहिती मिळाली आहे, असाही दावा सरकारने केला आहे.
 
 
हावडा येथे आंदोलक बॅरिकेड्सवर चढताना लाठीचार्ज

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार-हत्या प्रकरणी न्याय मिळावा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'नबान्ना अभियान' मोर्चा काढत आंदोलन केले. हावडा येथील संत्रागछी येथे पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढत पोलिसांशी झटापट केली. यासोबतच आंदोलकांनी सचिवालयाजवळील बॅरिकेड्सही तोडले.



आंदोलकांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सोबतच पोलिसांकडून लोकांवर लाठीचार्जही करण्यात आला. लाठीचार्ज, पाण्याच्या तोफांचा पाऊस आणि अश्रुधुराच्या गोळीबारानंतरही आंदोलक हावडा पुलावरून मागे हटायला तयार नाहीत. पोलिस-प्रशासन आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असतानाच आंदोलकांनी हावडा ब्रिजवरच ठिय्या मांडला आहे. अनेक आंदोलकांच्या हाती तिरंगा ध्वज असल्याचे पाहायला मिळाले.
 

अग्रलेख
जरुर वाचा
शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन :पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121