अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार! पीडिता राहिली गर्भवती

    23-Aug-2024
Total Views |

Patana 
 
पाटणा: गुलाम हैदर उर्फ ​​रमजान नावाच्या कट्टरपंथी तरूणाने १४ वर्षांच्या अल्वपीयन मुलीवर लैंगिक शोषण करत पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपासून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबाला गर्भपात करण्यासाठी हैदरने दबाव आणला. पीडित मुलगी आणि कुटुंबाचा गर्भपाताला विरोध असल्याने आरोपीने पीडितेला आणि तिच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना बिहारमधील पूर्णियामध्ये घडली आहे. याप्रकरणात स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 
मंगळवारी २० ऑगस्ट रोजी बयासी पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पीडितेच्या आईने जबाब नोंदवला होता, आरोपी हैदर हा पीडितेवर एप्रिल महिन्यांपासून अत्याचार करत होता. भीतीपोटी मुलीने कोणालाच काही सांगितले नाही, मुलगी जेव्हा गर्भवती झाली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
 
हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपीने मुलीच्या कुटुंबियांना गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला असल्याचे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. तसेच पीडितेच्या लग्नात पैसे देऊ असे आमिष दाखवण्याचे काम आरोपीने केले आहे. मात्र, पीडितेच्या कुटुंबियांनी गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पीडितेचे आणि तिच्या वडिलांचे आरोपीने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
 
त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिचे वडील हे आपल्या कुटुंबाला भेटले आहेत. बयासी पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. तसेच याप्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.