गणपतीत कोकणाक न जाण्याचं दुःख सांगता अंकिता प्रभू वालावलकर …

    23-Aug-2024
Total Views | 82

ankita  
 
 
मुंबई : अंकिता प्रभू वालावलकर मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता तिचा खेळ उत्तम खेळत असल्यामुळे तिने बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन होण्याचा बहुमानही मिळवला होता. दरम्यान, अंकिता ही कोकणातील असल्यामुळे तिच्यासाठी गणेशोत्सवाचे खास महत्व आहे. आणि सध्या गणेशोत्सव अगदी जवळ आला असून अंकिता मात्र बिग बॉसच्या घरात असल्यामुळे तिला घरी गणपतीला जायला मिळणार नाही म्हणून ती अस्वस्थ झालेली पाहायला मिळाली.
 
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात अंकिता धनंजय यांना गणेशोत्सवासाठी कोकणात यंदा जाता येणार नाही यामुळे फार अस्वस्थ वाटत असल्याचे बोलत आहे, ती असं देखील म्हणत आहे की माझ्या ना अंगात काहीतरी होतंय, भजनासाठी हात शिवशिवत आहेत.
 
तसेच, काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात योगिता चव्हाणशी बोलताना अंकिताने एक खास किस्सा सांगितला होता. होणाऱ्या नवऱ्याला लग्नासाठी होकार देताना अंकिताने त्याच्यासमोर गणेश चतुर्थीविषयी काय अट ठेवली होती, याचा खुलासा तिने केला आहे.
 

ankita  
 
अंकिताच्या घरी खूप आधीपासून गणपती आहे. अंकिता लहान असताना त्यांच्या घरात मुलगा नसल्याने तिच्या आई-बाबा आणि आजीला गणपतीचं पुढे कोण करणार, याची काळजी होती. त्यावेळी घरच्या गणपतीची सर्व तयारी मी करेन असं अंकिताने ठरवलं होतं. पुढे मोठं झाल्यावर तिला कळलं की, तिचं लग्न झाल्यावर ती दुसऱ्या घरी जाईल. नवऱ्याच्या घरीही गणपती असेल असा विचार तिने केला. त्यामुळे अंकिताने जेव्हा तिच्या प्रियकराला लग्नासाठी होकार दिला त्याआधी तिने गणपतीविषयी चौकशी केली. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी ७ दिवसांचा गणपती असतो. अंकिताच्या घरीही ७ दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने अंकिताला सुचवलं की तिच्या घरचा गणपती ९ दिवसांचा करावा. म्हणजे शेवटच्या दोन दिवशी नवऱ्यासोबत अंकिता तिच्या घरी जाऊ शकेल असं सध्या तरी तिने ठरवलं आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121