ब्रेकिंग! MPSC ची तारीख पुढे ढकलली

    22-Aug-2024
Total Views | 40
 
MPSC
 
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दि. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनंतर एमपीएससीने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पुण्यातील शास्त्री रोडवर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. २५ ऑगस्टला घेण्यात येणारी MPSC ची परिक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवारदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. एमपीएससी आणि आयबीपीएसची परिक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याने एमपीएससीची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
 
हे वाचलंत का? -  बदलापूर अत्याचार प्रकरणी 'सुमोटो' याचिकेवर सुनावणी सुरु! न्यायालयात काय घडलं?
 
दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजता यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रविवार, २५ ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरात लवकर जाहिर करण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..