नवी दिल्ली : देशातील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस दलांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत अल-कायदाचा प्रभाव असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचे प्रकरण उघडकीस आले. झारखंड राज्यातील रांची येथील डॉ.इश्तियाक यांच्या नेतृत्वाखाली हे मोड्यूल देशभरातील सार्वजनिक ठिकाणी हल्ले घडवून आणण्याचे काम करत आहे.
दहशतवाद्यांना दहशतवाद कसा घडवून आणायचा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. राजस्थानातील भिवाडी येथे हे प्रशिक्षण देण्यात आल्याने पोलिसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणात ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देशातील विविध भागातून ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. देशाच्या विविध १७ ठिकाणी छापे टाकण्यात आले असल्याचे आढळले.
मिळालेल्या माहितीनुसार, अल-कायद्याचा प्रभाव असलेला हा दहशतवादी मॉड्यूल देशभरात अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होता. राजस्थानातील भिवाडी येथील शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणादरम्यान, ८ आतंकवाद्यांवर संशय असून ६ आतंकवाद्यांना ताब्यात घेतले गेले आहे. याप्रकरणात पोलिसांनी देशातील विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
छापे टाकलेल्या ठिकाणी दारूगोळा, शस्त्रे जप्त केले आहे. मात्र अद्यापही त्याचा वापर होतो. या स्पेशल सेलने संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे दहशतवादाविरोधाच्या लढ्यात यश मिळाले आहे.