कट्टरपंथी विद्यार्थ्याकडून हिंदू विद्यार्थ्यास इस्लाम धर्म स्विकारण्यास केली जबरदस्ती
02-Aug-2024
Total Views | 133
(Image Credit : Insight Uk X Account)
लंडन (conversion in islam) : कट्टरपंथींनी हिंदू विद्यार्थ्याचा जबरदस्ती धर्मांतरण (conversion in islam) करण्याचा प्रयत्न केल्याची बाब लंडनच्या स्प्रिंगवेल स्कुलमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने जबरदस्ती धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांनाही शाळेतून काढून टाकले आहे. पीडित विद्यार्थ्याला त्याचे नाव बदलून मोहम्मद कर, अशी जबरदस्ती या तीन मुलांनी केली होती. जर नाव बदलले नाही, तर आम्ही तुझ्याशी मैत्री करणार नाही, अशी धमकीही त्यांनी त्याला दिली.
पीडित तरुणाला हलाल मांस खाण्याची जबरदस्तीही केली. हलाल मांस खाल्याने शरिरातील ताकद वाढत असल्याचे कट्टरपंथी विद्यार्थ्याने सांगितले. या घडलेल्या प्रकरणात पीडित हिंदू मुलाच्या आई-वडिलांना कळला. त्यानंतर त्यांनी शाळेत येऊन वर्गशिक्षिकांकडे तक्रार केली. मात्र, त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा इयत्ता सातवीत शिकत होता. त्याच्या मित्रांनी त्याला नाव ठेवण्यास जबरदस्ती केल्याने त्यानेही आईवडिलांकडे हाच हट्ट धरला. "माझे नाव मोहम्मद ठेवा," अशी मागणी तो करू लागला. हे चुकीचे असल्याची विनंतीही त्यांनी केली. मात्र, तरीही तो ऐकेना.
काही कालावधीनंतर घडला प्रकार वडिलांनी मुलाच्या प्राध्यापकांना सांगितला. यानंतर प्रकरणाची दखल घेत प्रध्यापकांनी तीन कट्टरपंथी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले. पीडित मुलाचे वडिल म्हणाले की, "माझ्या मुलाला कोणत्याच धर्माबाबत सांगत नाही. मी त्याला आमच्या (हिंदू) धर्माबाबतही सांगत नाही. मात्र अशा काही मुलांना त्याला टार्गेट केलं आहे." तसेच असं का घडत आहे याबाबत त्याने सवाल उपस्थित केला आहे. तसेच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसोबत त्याने यासंदर्भात चर्चा देखील केली आहे.