बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोरीवलीत 'जन आक्रोश मोर्चा'

    19-Aug-2024
Total Views | 57

Hindu Jana Akrosh Morcha Borivali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Borivali Hindu)
हिंदू नववर्ष स्वागत समिती, बोरीवलीच्या वतीने रविवार, दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी ६ वाजता, बोरीवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दीड हजारांहून अधिक हिंदू या ठिकाणी जमले; ज्यामध्ये ११०० हून अधिक पुरुष आणि ४०० च्या आसपास महिलांचा समावेश होता.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, विश्व संवाद केंद्रचे कोकण प्रांत संपादक पराग नेरूरकर, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खंणकर यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. बांगलादेशातील परिस्थीती आपल्या देशात उद्भवू नये म्हणून सकल हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर या एकत्रीकरणाचे रूपांतर भव्य मोर्चात झाले.

बोरिवली स्टेशन पासून सुरू झालेला ह्या मोर्चाची सांगता वंदे मातरम् गीताने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरिवली पश्चिम येथे झाली. बोरिवली विधानसभा आमदार सुनील राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुंबई महानगर सहकार्यवाह विलास भागवत, यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121