आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सहकार्य वाढविण्यावर भर; केंद्रीय अर्थमंत्री-आयएमएफ यांच्यात बैठक

    17-Aug-2024
Total Views | 31
imf and central government meeting


नवी दिल्ली :          भारत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)सोबत सहकार्य वाढविण्यासाठी आवश्यक मार्ग शोधण्यास तयार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आयएमएफच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत वित्तीय एकत्रीकरणासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.




दरम्यान, या बैठकीत गीता गोपीनाथ वित्तीय एकत्रीकरणासाठी सरकारच्या उपाययोजनांसाठी अर्थमंत्र्यांचे कौतुक केले. आयएमएफसह सहकार्य आणि सतत प्रतिबध्दतेला महत्त्व देण्यात आले असून केंद्र सरकार सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढ लक्षात घेऊन गोपीनाथ यांनी आयएमएफ सोबतच्या मजबूत संबंधांची प्रशंसा केली आहे. केंद्र सरकार आणि आयएमएफ यांच्यातील बैठकीत परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला असून आगामी काळात विविध पर्यायांचा शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.






 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121