मुंबई : विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
मुंबई महापालिकेचे क्षेत्र मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन महसूल क्षेत्रात मोडते. मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हे हे दोन जिल्हे मिळून महापालिका क्षेत्रात एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. दरम्यान आयोगाने महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्याचप्रमाणे आता, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मदतीला एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी
१) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी
(विद्यमान जिल्हाधिकारी - संजय यादव)
(महसूल मुंबई शहर जिल्हा)
(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मुंबई)
२) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)
(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी)
(महसूल क्षेत्र- मुंबई शहर जिल्हा)
(लोकसभा मतदार संघ - दक्षिण मध्य मुंबई)
३) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)
(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी)
(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)
(लोकसभा मतदारसंघ - दक्षिण मध्य मुंबई,मुंबई उत्तर पूर्व)
४) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी
(विद्यमान जिल्हाधिकारी - राजेंद्र क्षीरसागर)
(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)
(लोकसभा मतदारसंघ- उत्तर मध्य मुंबई)
५) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)
(महसूल क्षेत्र- मुंबई उपनगरे जिल्हा)
(लोकसभा मतदारसंघ - उत्तर पश्चिम मुंबई)
६) अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)
(विद्यमान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर)
(महसूल क्षेत्र - मुंबई उपनगरे जिल्हा)
(लोकसभा मतदारसंघ - उत्तर मुंबई)