कोलकाता येथे आंदोलक आणि रूग्णालयावर गुंडांचा हल्ला

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केल्याचा भाजपचा आरोप

    15-Aug-2024
Total Views | 52

image bangal
 
नवी दिल्ली, दि. १५ : विशेष प्रतिनिधी कोलकात्यातील आरजी कार (RG Kar hospital) वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालया झालेल्या बलात्काराविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बुधवारी मध्यरात्री गुंडांकडून भीषण हल्ला चढविण्यात आला. हा प्रकार स्थानिक राजकीय पक्षांच्या गुडांनी घडविल्याचा आरोप ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट असोसिएशन या संघटनेने केले आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयावर मोठ्या संख्येने गुंडांच्या जमावाने भीषण हल्ला चढवला. अशी घटना घडल्याने डॉक्टर, रुग्ण आणि सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले. रात्री उशिरा आंदोलकांच्या वेशात हल्लेखोरांनी रुग्णालयात प्रवेश केला. तासभर रुग्णालयात गोंधळ सुरू होता. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून कॅम्पसची तोडफोड केली तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली.
 
आंदोलकांच्या वेशात सुमारे 40 हल्लेखोर रुग्णालयाच्या आवारात घुसले. मालमत्तेचे नुकसान केले आणि तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. या हल्लेखोरांनी काठ्या, विटा आणि रॉड आणल्याचे पोलिसांनी सांगितले. बदमाशांनी परिसरातील आणि आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे उद्ध्वस्त केले आणि ज्युनियर डॉक्टर ज्या स्टेजवर आंदोलन आणि संपावर बसले होते त्या स्टेजचीही तोडफोड केली. या घटनेत पोलिसांचे वाहन पलटी झाले असून तेथे उभ्या असलेल्या अनेक दुचाकींचेही नुकसान झाले आहे. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 'रिक्लेम द नाईट' मोहिमेचा भाग म्हणून मध्यरात्री आंदोलक (बहुतेक महिला) रस्त्यावर उतरले आणि रुग्णालयाच्या बाहेर पोहोचले तेव्हा ही घटना घडली. परिस्थितीला हिंसक वळण लागले.
 
 
 
हे तर तृणमूल काँग्रेसचेच गुंड
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी आरजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयावर हल्ला केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिशय धुर्तपणे आपले गुंड आंदोलकांच्या वेशात तेथे पाठवले होते. त्यांच्याद्वारे पुरावे नष्ट करण्याचा तृणमूल काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, ते अतिशय मूर्ख गुंड असल्याने त्यांन दिलेले काम पूर्ण करता आले नाही. परिणामी त्यांनी निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि रूग्णालयामध्ये तोडफोड केल्याचा आरोप प. बंगाल विधानसभेते विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121