उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लुटला विविध खेळांचा आनंद! कोराडी तालुका क्रीडा संकुलाचे उद्धाटन संपन्न
15-Aug-2024
Total Views | 34
नागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोराडी तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. कोराडी तालुका क्रीडा संकुल हे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बरोबरीचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अत्यंत आधुनिक सुविधांनी युक्त असे हे क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुलच्या बरोबरीचे आहे, ही विशेष बाब आहे. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग तसेच जिन्मॅस्टिकची खास सुविधा आहे. खेळाडूंना सरावासाठी अतिशय उत्तम अशी जिन्मॅस्टिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."
"या संकुलात चांगल्या दर्जाचे जीम तयार करून देण्यात आले आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगली संधी प्राप्त होईल. कोराडी तालुक्यात चांगले खेळाडू तयार होतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर भाजप नेत्यांसोबत वेगवेगळ्या खेळांचा आनंद लुटला.