नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस राज्यसभा खासदार साकेत गोखले यांच्याविरोधात अहमदाबाद विशेष न्यायालयाकडून फौजदारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, गोखले यांच्याविरुध्द मनी लाँडरिंग प्रतिबंंधक कायद्यांतर्गत(पीएमएलए) क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अहमदाबाद (ग्रामीण) विशेष न्यायालयाने तृणमूल खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते गोखले यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा २००२ अंतर्गत फौजदारी आरोप निश्चित केले आहेत, असे सक्तवसुली संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात गोखले यांनी क्राउड फंडिंगद्वारे जमा केलेली रक्कम स्वत:वर खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, साकेत गोखले यांनी शेअर बाजारातील इंट्रा-डे ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड बिल भरणे इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर या पैशाचा गैरवापरही केला नसल्याचे गोखले यांचे म्हणणे आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, विशेष न्यायालयाने गोखले यांनी सीआरपीसीच्या कलम ३०९ अंतर्गत दाखल केलेला अर्ज फेटाळला होता. जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या अनुसूचित गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत पीएमएलए अंतर्गत कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली होती.