तामिळानाडूतील १०० हून अधिक वंचित परिवारातील महिलांचा मंदिरात प्रवेश
14-Aug-2024
Total Views | 30
चेन्नई : तामिळनाडू येथील हिंदू देवतांच्या मंदिरात वंचित महिलांनी प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून वंचित महिलांना हिंदू देव- देवतांच्या मंदिरात प्रवेश देण्यापासून विरोध केला जात होता. मात्र, १०० हून अधिक कुटुंबियांनी १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथील कुलवाईपट्टी गावात असलेल्या भगवती अम्मा मंदिरात प्रवेश केला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या शांतता बैठक आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे. वंचितांनी देवळात प्रवेशच केला नाहीतर त्यांचे धार्मिक कार्य केले. गेल्या काही वर्षांआधीपासून विशिष्ट समाजातील लोकं मंदिरात प्रवेश देण्यापासून विरोध करत होती. मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या शांतता बैठक आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
वंचित समाजाचे सदस्य शक्तियार्थिनम यांनी म्हटले आहे की, "असंख्य वर्षांच्या कालावधीनंतर आम्ही आमच्या उपासनेचा हक्क बजावला. ७ वर्षांआधी मंदिराच्या अभिषेक करताना वंचित समुदायाचा सल्ला घेण्यात आला होता. मात्र जातीभेदामुळे आमच्या सल्ल्याला नकार देण्यात आला होता", असे ते म्हणाले.
दरम्यान याप्रकरणी इलायराजा यांनी सांगितले की, ज्यादिवशी वंचितांनी मंदिरामध्ये प्रवेश केला त्यावेळी कोणीही पुजारी नव्हते. "आम्ही सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागाकडे दलितांच्या उपस्थितीचा आदर करणाऱ्या पुरोहिताची मागणी करू."वास्तविक, मद्रास उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर वचितांनी अरथांगीजवळील कामाक्षी अम्मा मंदिरातील एका विधीत भाग घेतला होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात वंचित महिला, पुरूष आणि लहान मुलांनी पोलिस संरक्षण घेऊन मंदिरात प्रवेश केला होता. त्यांनी गेल्या ८० वर्षांपासून मंदिरात प्रवेश केला नाही, असा उलगडा झाला.