सुशांत आणि अदा दोघेही भाडेकरू, मग घर नेमकं कुणाच्या मालकीचं?

    13-Aug-2024
Total Views | 60

adah  
 
 
 
मुंबई : 'बस्तर', 'द केरळ स्टोरी' या चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बांद्राच्या घरी राहात आहे. हे तेच घर आहे जिथे सुशांतने आत्महत्या केली होती. पण अदा ही त्या घराची मालकीण नसून तिथे भाडेकरु म्हणून राहात आहे. याबाबत तिने नुकताच खुलासा केला असून ती आणि सुशांत दोघेही भाडेकरी असून ते घर श्री लालवानी यांचं असल्याचं अदानं सांगितलं आहे.
 
दरम्यान, अदाला विचारलं की, "तू सुशांतचं घर भाड्याने घेतले आहेस की विकत घेतले आहेस?" या प्रश्नावर उत्तर देत अदा शर्मा म्हणाली, "मी ते भाड्याने घेतले आहे, विकत घेतलेले नाही. 'द केरला स्टोरी' चित्रपटाची ३०० कोटींची कमाई माझी एकटीची नाही. मी भाडेकरु म्हणून राहत आहे, पण ते श्री लालवानी यांचे घर आहे. सुशांतही तिथे भाड्यानेच राहत होता", असा खुलासा तिने केला आहे.
 
अदाने यापुर्वी एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, 'मी आयुष्यभर पाली हिल येथे एकाच घरात राहिले आहे. तिथून मी पहिल्यांदाच बाहेर पडले. मी आपल्याला जाणवणाऱ्या वाईब्सबद्दल खूप जास्त पझेसिव्ह असून हे ठिकाण मला सकारात्मक उर्जा देते. केरळ आणि मुंबईतील आमची घरे झाडांनी वेढलेली आहेत, आम्ही तिथे पक्ष्यांनाही खायला घालायचो. त्यामुळे, मला असे घर हवे होते जिथून असे सुंदर दृष्य दिसेल. तसेच आम्ही पक्ष्यांनाही खायला घालू शकू”. दरम्यान, अदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अदा कमांडो २, कमांडो ३ आणि बायपास रोड, 'द केरला स्टोरी', बस्तर या चित्रपटांमध्ये झळकली होती. लवकरच अदा तुमको मेरी कसम या चित्रपटात अभिनेत्री ईशा देओल सोबत झळकणार आहे. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121